Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनिल चौधरींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

औरंगाबाद प्रतिनिधी । महिलेकडून गाळा खरेदी करण्यासाठी ६० लाख ७० हजार रूपये घेऊन खरेदीस नकार दिल्या प्रकरणी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांचा जामीन आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याआधी त्यांचा अंतरीम जामीन फेटाळण्यात आला होता. यानंतर चौधरींना आज पुन्हा हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांना धक्का बसला आहे.

भुसावळ येथील महिलेची रुपये ६० लाख ७० हजार रुपये आरटीजीएस द्वारे घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अनिल चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता. दिनांक २६ एप्रिल रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आज झालेल्या सुनावणीत अनिल चौधरी यांच्या वतीने अ‍ॅडव्होकेट रश्मी कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की आम्ही सदरील रक्कम ही उसनवार घेतलेली असून ती परत देण्यास तयार आहोत. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा. परंतु फिर्यादीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद करताना सांगितले की सदर रक्कम ही गाळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पोटी फिर्यादी सौ ममता सनान्से यांनी आरटीजीएसद्वारे आरोपीच्या खात्यात जमा केलेली केली असून आरोपीने पैसे घेऊन खरेदी खत करून न देता गाळ्यांचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे फिर्यादीची फसवणूक झालेली असून आरोपीची राजकीय व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पहाता त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला.

दरम्यान, सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत गुन्हा निष्पन्न होत असून तपासा कमी आरोपीची पोलीस कस्टडी आवश्यक असल्याचे सांगितले. या सुनावणीनंतर प्राप्त दस्तऐवज व झालेल्या व्यक्ती वादावरून न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी अनिल छबिलदास चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला अर्ज फेटाळला. सर्वात महत्वाचे म्हणजे
जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अनिल चौधरी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतरिम जामीन देण्यात यावा ही विनंती केली असत तीही उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अनिल चौधरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्यांना सुप्रीम कोर्टात दाद मागावी लागणार आहे. तर दुसरीकडे स्थानिक पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे आता चौधरी पुढे नेमके काय करणार ? याकडे सवार्र्ंचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संदर्भात अनिल चौधरी यांची बाजू जाणून घेतल्यासाठी त्यांचे पुत्र धीरज चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तीनदा कॉल करून देखील संवाद साधला नाही.

Exit mobile version