Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी अजय भोळे !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांची भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यात प्रदेशाध्यक्षांसह उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस यांचा समावेश आहे. जिल्ह्याचा विचार केला असता माजी आमदार स्मिता वाघ यांना पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आहे. अर्थात, त्यांचे पद कायम राखण्यात आलेले आहे.

यासोबत भुसावळचे माजी नगरसेवक तथा भाजपच्या ओबीसी सेलचे माजी पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांना प्रदेश चिटणीसपदावर नियुक्ती मिळाली आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी असून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Exit mobile version