Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात राष्ट्रीय स्काऊट गाईड आणि योगा शिबीराचे उद्घाटन

bhusawal News

भुसावळ प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय स्काऊट गाईड आणि योगा शिबीराचे उद्घाटन भुसावळ रेल्वे मंडळाचे रेल्वे प्रबंधक आर.के. यादव यांच्याहस्ते करण्यात आले. सुरूवातीला भारत स्काऊट आणि गाईडचे ध्वजारोहण झाले. रेल्वे प्रबंधक श्री. यादव यांनी स्काऊट आणि गाईड यांना मार्गदर्शन केले. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नतेसाठी योग प्राणायम आपल्या नित्यचर्चा करण्याची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. योग एक जीवन पध्दती नसून शरीर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी उत्तम असल्याचे त्यानी सांगितले. भारत स्काऊट गाईडच्या मुख्यालयाने भुसावळ मंडळात विश्व योगा दिन आणि तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा मुख्य आयुक्त आणि अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा, जिल्हा आयुक्त (स्काऊट) आणि वरिष्ट कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, वरिष्ट मंडळ अभियंता एम.बी.तोमर, वरिष्ट मंडळ यांत्रिक अभियंता श्री लक्ष्मी नारायण, वरिष्ट मंडल गृह आणि पर्यावरण प्रबंधक रामचंदन, मुख्य चिकित्सा अधिकारी पी सामंतराय, सर्व सहाय्यक अधिकारी, राजभाषा अधिकारी, सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे अधिकारी, विदयुत विभागाचे अधिकारी, आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

या शिबिरात महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ मध्य रेलवे, उत्तर पश्चिम रेलवे, पश्चिम रेलवे, स्काऊट- गाईड या राष्ट्रीय स्तराच्या स्काऊट गाईड शिबिरात 200 विद्याथ्री शामिल झाले आहेत. योग शिबिरात उपस्थित मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि योगसनासवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात स्काऊट आणि गाईडस यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

Exit mobile version