Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात विद्यार्थ्यांनी अनुभवले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण (व्हिडीओ)

bhusaval 3

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमच्या विद्यार्थ्यांनी आज होणा-या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चांद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपणाचा थरार लाईव्ह अनुभवला आहे.

भारतीय अंतराळ क्षेत्राचे, शास्त्रज्ञ, अभियंते, प्रणेते व इस्रोचे अध्यक्ष ते प्रत्येक कर्मचारी यांच्या कार्य कर्तृत्वाला प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सलाम ठोकला. भारताने अंतराळ संशोधनात मोठ्या प्रमाणात यश कमावले आहे. हे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारताकडे सर्वांत जास्त उपग्रह आणि याचा पाया विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांनाच रचतात. सॅटेलाईट कम्युनिकेशच्या मदतीने भारतातील शेतकरी, मच्छिमार किंवा सामान्य नागरिक कोणीही आज सहजपणे एटीएम वरून पैसे काढू शकतात. हे फक्त भारतीय उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनच्या अभियंत्यांनी अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
भारताच्या अंतराळातील कामगिरीचा दबदबा संपूर्ण जगभर नावाजला जातो आणि भारताचे हे प्रयत्न जनतेच्या फायद्यासाठीचे आहेत. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हा असला तरी या मोहिमेतून भारताच्या येणाऱ्या  अवकाश मोहिमांसाठी हा अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी सांगितले.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतके आहे. चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. ६ ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या काळात अभियंत्यांच्या ज्ञानाची व संयमाची कसोटी लागेल. भारताच्या चंद्रावरील प्रवासाची सुरुवात अत्यंत दमादारपणे झाली आहे. तशीच लँडिंगही यशस्वी होईल असा विश्वास विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला. प्रसंगी प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा. सुलभा शिंदे, प्रा.दिपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.दिपक साकळे, प्रा.धिरज पाटील व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

&

Exit mobile version