Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील लक्ष्मी चौकातील जुनी इमारत कोसळली (व्हिडीओ)

bhusaval

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या 3 दिवसापासून जोरदार पावसामुळे येथील मध्यवर्ती भागात असलेल्या लक्ष्मी चौकाजवळची जुनी इमारत कोसळली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र इमारती जवळ असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या जामा मजीत लक्ष्मी चौकाजवळ एक जुनी इमारत कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. जुनी इमारत असल्याने या इमारतीमध्ये कुणीही राहत नसून गोडाऊन म्हणून या इमारतीचा वापर करण्यात येत होता. संततधार पावसामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती रहदारीच्या रस्त्यावर ही इमारत असून इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सुरक्षा एजन्सीचे विनोद शर्मा यांनी 10 ते 15 जणांना तात्काळ इमारतीपासून दूर केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र इमारती बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Exit mobile version