Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ शहरात भव्य कावड यात्रा (व्हिडीओ)

bhusaval 2

भुसावळ प्रतिनिधी । श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आज दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता राजस्थानी विप्र समाज, शिव मंडळ आणि अलंकार मंडळातर्फे शहरात भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही भव्य यात्रा महादेव मंदिरपासून ते तापी नदी विठ्ठल मंदिर, शिव मंदिर लक्ष्मी चौक असे मार्गांनी काढण्यात आली. राम मंदिरात आरती व प्रसाद अर्पण करण्यात आला. राजस्थानी हिंदी भाषिक समाजातील हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे कावड यात्रेनिमित्ताने साबुदाणा खिचडी व चहा असे प्रसाद म्हणून सर्व भाविकांना वाटण्यात आला. याप्रसंगी राधे भक्त बिरदीचंद लाहोटी, विनोद शर्मा, उमाकांत शर्मा, जगदीश अग्रवाल, गोकुल अग्रवाल, संजय अग्रवाल, गौरव शर्मा, पंडित जगदीश शर्मा, पंडित गोपाल शर्मा, कैलाश अग्रवाल, दीपचंद आगीवाल, गोसेवक रोहित महाले, अमोल सोनार, गणेश पाटिल, शुभम अग्रवाल, मोंटू वर्मा, दिनेश माहेश्वरी, आशीष तिवारी आदी उपस्थितीत होते.

Exit mobile version