Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते विविध डांबरी रस्त्याचे भूमिपूजन

सावदा ता.रावेर प्रतिनिधी | तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

तालुक्यातील ‘भुसावळ रोड ते पिळोदा रस्ता’, ‘भालोद ते बामणोद रस्ता व ‘एबी रोड साखर कारखाना ते यावल रस्ता डांबरीकरणचा शुभारंभ तसेच ‘भालोद – हंबर्डी रस्त्याच्या डांबरीकरणचा लोकार्पण आणि ‘वड्री’ गावाजवळील रस्त्यावर पुल बांधकाम करणे या मंजूर झालेल्या कामांचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, लिलाधर चौधरी, नितीन चौधरी, धनंजय चौधरी, नितीन चौधरी, किशोर महाजन, विलास चौधरी, कृष्णा चौधरी, हेमा झाम्बरे, अप्पा बिस्कुटे, पियुष चौधरी, मधू पाटील, नारायण प्रजापती, गिरधर पाटील, डॉ.इंगळे, जगदीश महाजन, फैजपूर नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाले, कलीम मेंबर, जयंत चौधरी, अनिल पाटील, अविनाश चौधरी, प्रदिप पाटील, निलेश फिरके, पराग पाटील, विनोद पाटील, जितेंद्र पाटील, एस.के.चौधरी, अनिल पाटील, संदीप तळेले, संजय तडवी, धीरज कुरकुरे, गजानन अढायगे व पिळोदा, पाडळसा, वड्री, फैजपूर, भालोद येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version