Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील बांबरुड – कुरंगी जिल्हा परिषद गटात जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून साठवण बंधाऱ्यांच्या सुमारे ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बांबरुड – कुरंगी जिल्हा परिषद गटात येथील जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वडगाव टेक – १ – साठवण बंधारा बांधणे – ७९ लाख १९ हजार ९१६ रुपये, वडगाव टेक – २ – साठवण बंधारा बांधणे – ८० लाख ५८ हजार ७९१ रुपये, पाचोरा येथे साठवण बंधारा बांधणे – ९५ लाख १५ हजार ४२ रुपये व दुसखेडा येथे साठवण बंधारा बांधणे – १ कोटी ७ लाख ४२ हजार २० रुपये अशा सुमारे ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या साठवण बंधाऱ्यांचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, नगरसेवक डॉ. भरत पाटील, बंडु चौधरी, शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील, बाजार समितीचे मा. संचालक शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, जारगावचे सरपंच सुनिल पाटील, डॉ. शेखर पाटील, दुसखेडा सरपंच शशि महाजन, मनोज पाटील, परधाडे सरपंच सचिन पाटील, वडगाव टेक सरपंच भगवान पाटील, आसनखेडा सरपंच कैलास पाटील, भुषण पाटील, युवराज काळे (बांबरुड राणीचे), संदिप पाटील (खेडगाव नंदीचे) सह गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. यशवंत पवार यांनी तर उपस्थितांचे आभार जि. प. पदमसिंग पाटील यांनी मानले. कार्यक्रमानंतर पोस्टमन वसंत पाटील यांचे शेतात स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

Exit mobile version