Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे भूमिपूजन.

एरंडोल प्रतिनिधी | येथील मैत्री सेवा फाऊंडेशन संचलित ‘कल्पतरू वाचनालय’ या उपक्रमाचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

आ.चिमणराव पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीमधून मैत्री सेवा फाऊंडेशनच्या वाचनालयासाठी १० लक्ष रुपये मंजून करून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी हिताच्या कार्यास हातभार लावत असल्याचे सांगत मैत्री सेवा फाऊंडेशनाच्या तरुणांनी चालवलेला उपक्रम हा खरचं स्तुत्य व विधायक असून त्यांच्या कार्यास माझ्या सदैव शुभेच्छा आहेत व माझी कधीही मदत मागाल तेंव्हा विद्यार्थी हितासाठी नेहमी तत्पर असल्याचे वक्तव्य आमदार चिमणराव पाटील भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी मैत्री सेवा फाउंडेशनच्या कल्पतरू वाचनालयाला शुभेच्छा देत भविष्यात विद्यार्थी घडविण्यासाठी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मैत्री सेवा फाऊंडेशनचे कल्पतरू वाचनालयाच्या माध्यमातून खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होईल.असे गौरव उद्गार त्यानी काढले.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरपालिकेचे अभियंता श्री.शिंदे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय महाजन, समन्वय समिती अध्यक्ष रमेश महाजन, मा.नगराध्यक्ष देविदास महाजन, मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, मा.नगराध्यक्ष रवींद्र महाजन, मा.नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मा.उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, विशाल तिवारी, युवासेना शहर प्रमुख अतुल महाजन, उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, जितेंद्रभाऊ महाजन सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर व मैत्री सेवा फाऊंडेशनचे सदस्य करण पाटील, सागर महाजन, पियुष चौधरी, पंकज पाटील, मनोज महाजन, शुभम महाजन, संतोष जयस्वाल, तुषार महाजन, शामसिंग पाटील, हरीश चौधरी, निखिल शेंडे, जयविरसिंह राजपूत, साहिल पिंजारी, ज्ञानेश्वर महाजन, आदित्य पाटील, बाबुलाल पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version