Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मठगव्हान ते जळोद रस्त्याचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर प्रतिनिधी । मठगव्हान-जळोद दरम्यान रस्त्याची सुधारणा, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्‍यासाठी 2 कोटी 64 लाख निधी आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच जळोद, मठगव्हाण व पातोंडासह परिसरातील गावांच्या सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ.अनिल पाटील यांनी मठगव्हाण ते जळोद दरम्यान अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत 2.64 कोटी निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.

यावेळी जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण वसंतराव पाटील, निवृत्ती बागुल, एल.टी.नाना पाटील, धनराज आबा, पातोंडा सरपंच भरत बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक केदार पवार यांनी केले.आमदार अनिल पाटील यांनी यावेळी पुढे बोलताना सदर रस्त्यामुळे तापी काठच्या गावांची मोठी सोय होणार असून पुढील टप्प्यात हिंगोणे गावापर्यंत रस्ता झाल्यानंतर पांझरा परिसरात जाण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग तयार होणार असल्याचे सांगितले तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार पातोंडा रस्त्याची दुरुस्ती व पातोंडा मठगव्हान परिसरात नाल्यामुळे शेतात पाणी तुंबण्याच्या समस्येवर लवकरच उपाययोजना करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मतदारसंघात वेगाने होत असलेल्या विकास कामांबद्दल आमदारांचे कौतुक केले,सूत्रसंचालन शशिकांत साळुंखे यांनी केले.

यावेळी सावखेडा येथील भुपेश सोनवणे, कपिल सोनवणे.मुंगसे येथील सरपंच प्रकाश कोळी, महेंद्र कोळी, जितू कोळी.रुंधाटी येथील सरपंच रजनीकांत पाटील, हिरालाल नाना, विजु मास्टर, अनिल पवार, मनोहर पवार, राहुल पवार, कैलास बाविस्कर, शरद पवार, किशोर पाटील, मठगव्हाण येथील सरपंच प्रवीण वाघ, केदार पवार, जितेंद्र पवार, महेश पवार, शिवाजी पाटील, रामलाल पाटील, बंडू नाना, महेश पवार, बन्सीलाल पाटील, संजय पवार, पंढरीनाथ पवार.नालखेडा येथील ग्रा.पं सदस्य भटू कोळी, नानाभाऊ कोळी, प्रशांत शिरसाठ, रामलाल कोळी, शिवाजी कोळी.जळोद येथील सरपंच शशिकांत साळुंखे, संभाजी देशमुख, विलास देशमुख, बापुजी कोळी, धनंजय पाटील, मुन्ना चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, योगेश शेटे, बाळू डॉक्टर, नागो कोळी, मनोज साळुंखे.गंगापुरी उपसरपंच चंद्रकांत पाटील, भरत पवार, रघुनाथ कोळी.खापरखेडा नितीन पवार, रोहन पवार, रविंद्र पाटील, अनिल पवार, धनराज पवार यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Exit mobile version