Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरीष चौधरी यांच्या निधीतून रावेर पूर्व भागात ५ कोटी २७ लक्ष किमतीच्या कामांच्या भूमिपूजन  सोहळा 

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते आमदार निधी अंर्तगत व विविध योजनेअंर्तगत मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.

गावातील रस्ते काँक्रिटीकरण होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन गावातील कामे मंजूर केल्याबददल ग्रामस्थांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे आभार मानले.
निधी अंतर्गत १) मौजे. अजनाड, ता. रावेर येथे गावातंर्गत पेव्हर ब्लॉक – ०५ लक्ष आणि जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाण्याच्या टाकी सह पाईपलाईन बांधकाम करणे – १५२ लाख, २) मौजे. अटवाडे, ता. रावेर येथे विठ्ठल मंदीर ते बाजीराव सुकदेव धनगर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण – ०५ लक्ष, ३) गनी शे चाँद यांच्या घरापासून ते पांडुरंग पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – ०७ लक्ष, ४) मागासवर्गीय वस्तीत गटारीसह रस्ता काँक्रीटकरण – ९ लक्ष, ५) जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाण्याच्या टाकी सह पाईपलाईन बांधकाम करणे – ७५ लक्ष, ६) दुसखेडा, थोरगव्हान, गाते मस्कावद, दसनूर, निंभोरा, खिडीं, एनपूर, अजंदे, पातोंडी, खिरवड, मोरगाव, अजनाड रस्ता प्रतिमा – १४ किमी ५८/०० ते ६६/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (अटवाडे फाटा ते अजनाड) २३७.५० लक्ष, ७) मौजे. मोरगाव बु., ता. रावेर येथे यशवंत ओंकार पाटील यांच्या घरापासून ते हनुमान मंदीरापर्यंत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक – ०४ लक्ष, ८) मौजे. मोरगाव खु., ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण – ०५ लक्ष, ९) मौजे. वाघोड, ता. रावेर येथे मुरलीधर केशव महाजन यांच्या घरापासून ते सुधाकर तुकाराम महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक – ०६ लक्ष, १०) बस स्टैंड पासून स्मशानभूमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण – १२ लक्ष, ११) मागासवर्गीय वस्तीत रस्ते काँक्रीटकरण १० लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी सोबततालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गनवाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य योगेश सोपान पाटील,अजनाड, अटवाडा, मोरगाव, वाघोड येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version