Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोंगळ कारभार : डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रस्त्याचे काम निविदेनुसार करण्याची मागणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सार्वजनिक बांधकामाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रस्त्याचे काम निविदेप्रमाने होत नसून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते कुरा हा अंदाजीत वीस किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत होत आहे. दरम्यान, या रस्त्याकडे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे यावेळी डोलारखेडा गावातील गावकऱ्यांनीच निदर्शनास आणून दिले व होत असलेल्या रस्त्याचे काम हे  अधिकाऱ्यांची गैरहजेरी चा फायदा ठेकेदार कोणत्या पद्धतीने घेतात हे देखील यावरून लक्षात आणून दिले आहे.

या रस्त्याची कामाची सुरुवात झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने डागडुगी करण्यास सुरुवात केली त्यातही खडी न वापरता वरचेवर डांबर न टाकता कच वापरून गड्डे भरले जात असल्याने  गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. परंतु त्यावेळी ठेकेदार यांनी गावा समोरून काँक्रिटीकरण होणार असल्याचे भाकीत करीत गावकऱ्यांना गप्प केले. परंतु  दिनांक 3/3/2022 रोजी डोलखेडा फाटा पासून ते कुऱ्हा कडे  डांबरीकरण रस्त्याचे कामाची सुरुवात झाली यावेळी मात्र गावकर्‍यांचा संताप अनावर झाला व त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन देखील केले.

परंतु या ठिकाणी एकही शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित झालेले नाही या ठिकाणी तब्बल तीन ते चार तास गावकर्‍यांनी आंदोलन करीत रस्ता हा शासनाच्य एस्टिमेट प्रमाणात करावा अशी मागणी केली आहे. यावेळी काही गावकऱ्यांनी रस्त्याची थिकनेस मोजता ती 20 ते 25 एमएम इतकेच भरली तर ती 52 ते 65 एमएम इतकी असावी असाही गावकऱ्यांची मागणी आहे. इस्टेमेंटप्रमाणे काम करण्यात यावे अन्यथा काम बंद करावे अशी मागणी केली संबंधित कामगारांना केली.

ग्रामस्थांनी घातलेल्या वादामुळे नारायण नामक व्यक्ती या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून दाखल झाले. तसेच घटनेची माहीती कळताच बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश ढगे यांनी घटनास्थळी येऊन

काम इस्टेमेंटप्रमाणे न झाल्यास ‘रास्ता रोको आंदोलन’चा इशारा दिला आहे.गावकरी यांनी कामाठिकाणी थांबुन असेपर्यत काम व्यवस्थित होतांना दिसुन येत होते.

प्रसंगी बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल ढगे, डोलारखेडा येथील शिवाजी वानखेडे, कडु कोळी, विनोद थाटे, विजेंद्र कोळी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित घटनेची माहिती विचारणे करिता अधिकाऱ्यांना  भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलणे देखील टाळले आहे.

Exit mobile version