Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. राजूमामा भोळे

Bhilla samaj suport rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी हटकर समाज कार्यालयात आयोजित भव्य एकता मेळाव्यात केले. मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजसाहेब साळवी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुमनताई साळवी व महिला जळगाव जिल्हा अध्यक्ष गायत्रीताई सोनवणे हे उपस्थित होते

भिल्ल समाजाचा जाहीर पाठींबा
मेळाव्यात सर्व समाजाच्या वतीने जळगाव शहराचे महायुतीचे उमेदवार यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. व आदिवासी भिल्ल समाजाला शहरात हक्काची स्मशानभूमी व पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत सर्व समाज बांधवाना घरकुल मिळावे आणि मुलांच्या शिक्षणासाठी विविध दाखले मिळवण्यासाठी सहकार्य मिळावे असे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जमील शेख, सचिन परदेशी, बाळकृष्ण सूर्यवंशी, अॅड. मीर नाझीम अली, बोरसे दादा, मचाले दादा यासह असंख्य समाजबांधव हे उपस्थित होते.

Exit mobile version