Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत, आणखी काही असतील त्यांनीही जावं – उद्धव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाषणंत मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडलीय. पण एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने त्यांच्या बाजूने सर्व कायदेशीर निकाल लागले. पक्षात घडलेल्या या सर्व घटनांनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी पुन्हा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत, आणखी काही असतील त्यांनीही जावं’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “संघाबाबत मला आदर आहे, त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून वेळप्रसंगी मार खावून, शिव्या खावून काम केलंय. आज जे काही सुरू आहे, याचसाठी केला होता का अट्टहास? भारतमाता वाचवायची असेल तर जिद्धीने उभं रहायला हवं. आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत. आणखी काही असतील त्यांनीही जावं, मी मूठभर शिवसैनिकांना घेऊन पुढे जाईन”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

“गुंडागर्दीही जर राज्यकर्ते थांबवू शकत नाही तर मग त्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही. आज जर आम्ही चुकलो तर आमच्यावर टीका जरुर करा. पण कुठे चुकलो हेही सांगा. आपण अनेकांना पक्षात घेतलं. पण कोणाच्या पक्षाच्या मूळावर उठलो नाहीत. जिंकल्यानंतर समोरच्याला ठेचणं ही वृत्ती योग्य नाही. हे यांच्या मित्रपक्षाला संपवत आहेत. हे मी नाही गडकरी बोलत आहेत. सध्या पक्षात त्यांनाच स्थान राहीलं नाही”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“आमच्या घराणेशाहीवर बोलता तर बोला. माझी घराणेशाही वाईट काय? आमच्या घराणेशाहीला विरोध असेल तर तुमच्या एकाधिकारशाहीला ही आमचा विरोध आहे. आपल्याकडे भाजप एवढे पैसे नाहीत. मात्र सोन्यासारखी माणसं आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. मी त्यांना बोलतो मी कडवट हिंदू आहे. त्यावेळी ते म्हणतात तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. माणसाने धर्म घडवलाय, धर्माने माणून बिघडवू नका”, असं ठाकरे म्हणाले.

Exit mobile version