Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गृह विलगीकरणात असलेल्या बऱ्याच रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची गरज असल्याचे पाहून भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमरर्सच्या वतीने गरजूंसाठी २५ कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजूंनी विहित कागदपत्रांची पुर्तता करून निशुल्क सेवा पुरविली जाणार असल्याची माहिती जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांनी दिली आहे.

मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे, त्यांनी रुग्णास ऑक्सिजनची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजनची गरज आहे. त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. या फौंडेशनच्या वतीने निशुल्क दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे .

ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (९४२३७७४३४६), सुधीर पाटील (९८२३३६२३३०), उदय महाजन (९४२२७७६७०८), अनिल जोशी (९४३२५९४४८७), नितीन चोपडा (९४२३४८९८२४), अमर चौधरी (९३७२४०९४६८) डॉ. प्रदीप ठाकरे (९४२२७७५९०६) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version