Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाऊसाहेब नेटके यांची जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून भाऊसाहेब नेटके यांची नुकतीच जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलैद्रसिंग परदेशी हे होते. उपाध्यक्ष रविंद्र माळी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी भाऊसाहेब नेटके यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष वरद वाडेकर, रणजित पाटील, अभिजित येवले, उमेश वाडेकर, मयुर वाडेकर, देवेंद्र चंदनकर, योगेश नन्नवरे, जगदिश गुरव, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, सुधीर सोनवणे अजय कुलकर्णी उपस्थित होते.

भाऊसाहेब नेटके यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार भागवत पाटील, अव्वल कारकून सुरेश पाटील, रणजित पाटील, सिमा पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भाऊसाहेब नेटके यांचेवर परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Exit mobile version