Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी ते मनवेल रस्त्यावर भरधाव प्रवाशी रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. रिक्षाचालक रिक्षा सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी भास्कर उखा भील (वय-६२) हे आपल्या दुचाकीने आज मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामावरून साकळी येथे जात होते. दरम्यान साकळी ते मनवले रस्त्याने जात असतांना समोरून भरधाव रिक्षा (एमएच १९ एजे ०१९४) ने दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर भिल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होता रिक्षा चालक रिक्षा सोडून पसार झला होतो. याप्रकरणी मयताचा मुलगा ताथु भास्कर भिल याच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसात अपघातातील रिक्षा पोलीसात जमा करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. 

 

Exit mobile version