भरधाव पॅजो रिक्षा ट्रॅक्टरवर धडकली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवर भरधाव वेगाने जाणारी ॲपे रिक्षा समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जावून धडकल्याची घटना घडली. या अपघाता रिक्षाचालक जखमी झाला तर रिक्षाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील नांदगाव तालुक्यातील येवला येथील राजेंद्र कारभारी साळवे (वय-३९) हे ट्रॅक्टर चालक आहे. ते रविवारी ५ जून रोजी सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास (एमएच ४१ जे ७५०७) क्रमांकाचे ट्रॅक्टर घेवून शिरसोली रोडवरुन जकातनाका दरम्यान जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या ऍपे रिक्षाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात दोघ वाहनांचे नुकसान झाले असून ऍपेरिक्षाचालक नवनीत पाटील रा. रायसोनी नगर हे जखमी झाले आहे. राजेंद्र साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार ६ जून रोजी सकाळी ८ वाजता रिक्षाचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताङ्ग पठाण हे करीत आहे.

Protected Content