Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारची दुचाकीला धडक; दोन जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीतय्यब अरमान पटेल (वय-२९) रा. कुबा नगर, सुप्रिम कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मितय्यब पटेल हा त्याचा मित्र मोहसीन सैय्यद यांच्यासोबत जळगाव शहरातील काम आटोपून दुचाकीने सुप्रीम कॉलनीकडे जात असतांना आर.एल. चौफुलीजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच २०, जीएफ ९७२०) ने जोरदार धडक दिली. यात मीतय्यब पटेल आणि मोहसीन सैय्यद हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत मीतय्यत पटेल यांच्या फिर्यादीवरून  (एमएच २०, जीएफ ९७२०) क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

Exit mobile version