Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव बसची दुकाचीला धडक; दोन जागीच ठार

चोपडा, प्रतिनिधी । चोपडा आगाराची बस सातपुड्यातील देव्हारी येथुन परतत चोपडा येथे येत असताना बस व मोटार सायकलचा समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, चोपडा देव्हारी बस देव्हारीहुन वापस चोपडा येत असताना मेलाणे व कर्जाणे गावाचा मधे दुफारी दोन वाजता बस (एमएच १४ बीटी २१४२) व समोरून येणारी मोटार सायकल क्र. (एमएच १९ टीटी ७३१७) याची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील लक्ष्मण बाबु पावरा (२६) व सुरेश यावऱ्‍या पावरा (२७) दोघे रा.बोरमळी ता. चोपडा हे गावाकडे जात असताना अपघातात जागीच ठार झाले असुन त्यांना शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version