Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मंगळवारी ५ मार्च रोजी जळगाव शहरात सागर पार्क येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी तरुणांची संवाद साधला. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंत्री गिरीश महाजन यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते सायंकाळी ५ वाजता करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, खासदार रक्षा खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी आमदार चंदूभाई पटेल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Exit mobile version