Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आमदार राजूमामा भोळे आणि जळगावातील समाज बांधवांच्या वतीने जळगाव शहरातील रेल्वे स्थानक समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जळगाव शहरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने बुधवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यालया उजाळा दिला. या कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे महिला प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर सुनिल खडके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.

Exit mobile version