Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी महाविद्यालयात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात भरातरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया फालक यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत  वारके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले व आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू उलगडले. ज्ञान, दूरदृष्टी, उत्कृष्ट नियोजक, वाचक अशा विविध पैलूंचा मागोवा घेताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांचे दाखले दिले. संविधानाच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला मोठी देणगी दिली आहे.  बौद्धिक संपत्तीवर विजय मिळविला तरच आपण पुढे जाऊ शकतो  हा डॉ. बाबासाहेबांचा विचार त्यांनी सांगितला. सर्व युवकांनी भारतीय समाज सुधारकांच्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे यामुळे देश सशक्त होण्यास मदत होईल. महाविद्यालयातील प्रा. प्राजक्ता पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती दिली व त्यांच्या No peon no water ह्या आर्टिकल वर भाष्य दिले. याप्रसंगी महाविद्यालयातील MBA, BBA, BCA मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. MBA प्रथम वर्षातील दिव्या तळेकर या विद्यार्थिनीने आभारप्रदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील,  गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version