Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न जाहीर झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी स्वत: अडवाणी यांचे फोन करून स्वागत देखील केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत मोठे योगदान राहिलेले आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांचे कधी काळचे राजकीय गुरू म्हणून देखील अडवाणी ओळखले जातात. मध्यंतरी ते अडगळीत पडल्याचे मानले जात होते. या पार्श्‍वभूमिवर, आता त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

लालकृष्ण आडवाणी हे १९८६ ते १९९३ आणि नंतर १९९८ ते २००५ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते. खासदार म्हणून ३ दशके त्यांनी संसदेत काम केले. भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात १९९९-२००४ या काळात ते उपपंतप्रधान होते. राम मंदिर आंदोलनासाठी त्यांनी १९९० च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेने देशातील वातावरर ढवळून निघाले होते. भाजपला आगामी काळातील निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यात ही रथयात्रा महत्वाची भूमिका ठरवणारी ठरली होती.

Exit mobile version