Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भर दिवसा कॉलेज तरूणीची हत्या !

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथे भर दिवसा कॉलेज तरूणीची क्रूर हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली असून हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद येथे कॉलेजजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली.

मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घडली घटना असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

 

 

Exit mobile version