Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर गोळीबार; चार जणांवर गुन्हा

Gun fires

पारोळा (प्रतिनिधी)। तालुक्यातील पिंपळकोठा गावी पिल्लूक देवाच्या यात्रेच्या ठिकाणी भांडण सोडविण्यास गेला त्याचे वाईट वाटून एकाने गावठी कट्टयाने (बंदूक) गोळी झाडून एकास गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळवार 26 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत फिर्यादी चतेश्वर नथू पाटील (वय- 30) रा. पिंपळकोठा हे आरोपी जगदीश पुंडा पाटील व साक्षीदार यशवंत सुभाष पाटील दोन्ही रा. पिंपळकोठा ता. पारोळा यांचेतील सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्याचे वाईट वाटून जगदीश पाटील तसेच त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 अनोळखी इसम यांनी संगनमत करून त्याचे जवळील गावठी कट्टा (बंदूक) मधून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या छातीवर गोळी मारून त्यास गंभीर दुखापत केली तसेच आरोपी यांच्यासोबत असलेले त्याचे साथीदार यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची फिर्याद जखमी शनेश्वर पाटील यांनी धुळे पोलिसांना दिल्यावरून भाग ५ गुरनं २१८/१९ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ३४, आर्म ॲक्ट कलम ३, २५ प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

जखमी चतेश्वर पाटील हे धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे.यावेळी पारोळा व पिंपळकोठा गावी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग गोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवाडचे सपोनि राहुल फुला यासह पोलिसांनी भेट दिली.

पिंपळकोठा गावी छावनीचे स्वरूप
गोळीबार प्रकरणी पिंपळकोठा येथे जळगाव, अमळनेर, पारोळा येथील मोठा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असल्याने पिंपळकोठा येथे छावणीचे स्वरूप आले आहे. याबाबत आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Exit mobile version