Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाध्यक्ष अमित शहांनी घेतले सिध्दिविनायकाचे दर्शन

amit sasha

मुंबई प्रतिनिधी । भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सिध्दिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे. यानंतर दुपारी ते लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. काल सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा झाली. या सभेनंतर अमित शहा आज दि. 2 सप्टेंबर रोजी मुंबई दाखल झाले असून त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. तर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अभिनेते आदेश बांधेकर यांनी अमित शहा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सिद्धिविनायकाचे दर्शन झाल्यानंतर अमित शहा राजभवनकडे रवाना झाले. तसेच यावेळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

Exit mobile version