Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा युवा मोर्चाची आढावा बैठक; माजी मंत्री बावनकुळे यांचे मार्गदर्शन (व्हिडीओ)

 

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेत आज शुक्रवार २३ जुलै रोजी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीत ३० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आज २३ जुलै रोजी जळगाव जिल्हा दौरा होता. आज सकाळी १० वाजता वसंतस्मृती या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतल्यानंतर बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेत भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पक्ष संघटन व बांधणीसह आगामी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी एक जुटीने कामाला लागावे अश्या सुचना दिल्या. आढावा बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या चिटणीस पदी काजल कोळी, मयूर भोई आणि मंडल ३ च्या अध्यक्षपदी निखिल सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात चाळीसगाव येथील ३० युवा कार्यकर्त्यांनी भाजयुमो मध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या आढावा बैठकीला भाजयुमोचे जिल्हा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजूरकर, महेश पाटील, मिलींद चौधरी, उपाध्यक्ष गणेश महाजन, सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख, स्वामी पोतदार, जयेश ठाकूर, चिटणीस जयंत चव्हाण, प्रतिक शेट, सागर जाधव, आश्विन सैंदाणे, कार्यालय मंत्री भुषण पाटील, सोशल मीडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी, कोषाध्यक्ष ऋषीकेश येवले, युवती प्रमुख अबोली पाटील, मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, सोगर पोळ आणि महेश लाठी आदींची उपस्थिती होती.

 

Exit mobile version