Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘अनधिकृत तार कुंपणाचे काम थांबवावे.’ यासाठी भजन आंदोलन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराचे महंत महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्थ व निंब येथील ग्रामस्थांच्या वतीने आज तहसिल आवारात ‘मंदिरावर सुरू असलेल्या अनधिकृत तारेच्या कुंपणाचे काम पोलिसांच्या मदतीने थांबवावे.’ यासाठी भजन आंदोलन केले. आमदार अनिल भाईदास पाटील व तहसीलदार यांच्या  आश्वासनानंतर भजन आंदोलन मागे घेण्यात आले.

खान्देशातील भाविकांचे श्रद्धस्थान असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराजवळील जागेचा वाद पुन्हा एकदा बाहेर आला आहे. मुडावद ता शिंदखेडा येथील शिवाजी वाकडे नामक व्यक्ती कपिलेश्वर मंदिर परिसरातील जागा अनधिकृत पणे बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निवेदन मंदिर ट्रस्ट च्या वतीने तहसीलदार यांना काल देण्यात आले होते; परंतु महसूल प्रशासनाकडून सकारत्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराचे महंत महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्थ व निंब येथील ग्रामस्थांनी आज तहसिल आवारात मंदिरावर सुरू असलेले अनधिकृत तारेचा कुंपणाचे काम पोलिसांच्या मदतीने थांबवावे यासाठी भजन आंदोलन करण्यात आले.

तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भजन आंदोलन स्थळी जाऊन याबाबत विचारपूस केली. त्यानंतर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या दालनात बैठक घेत कपिलेश्वर मंदिर ट्रस्टीचं म्हणणे ऐकून घेतले आणि ‘अनधिकृत होत असलेले तारेचे कुंपणचे काम संध्याकाळपर्यंत थांबवले जाईल. तसेच लवकरच शासकीय मोजणी व दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक दि. ३० सप्टेंबरपूर्वी घेऊन हा प्रश्न कायमचा सोडविला जाईल.’ असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले. याप्रसंगी तहसीलदार मिलिंद वाघ तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिती होती.

यावेळी मंदिराचे मठाधीपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, डॉ. अनिल शिंदे, प्रा. अशोक पवार, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, मंदिराचे विश्वस्त, निम, कळमसरे, पाडळसरे मारवड, तांदळी, शहापूर, सह तालुक्यातील भाविक उपस्थित होते.

Exit mobile version