पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी वारकरी संप्रदायाचे भजन आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किर्तनात नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना निलंबित करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने सोमवारी ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरात २९ एप्रिल रोजी रात्री किर्तन सोहळा सुरू असतांना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदातील अंत्यत मानाच्या नारदाच्या गादीवर चालून कीर्तनात बुटासह येवून अर्वाच्य भाषेत उपस्थितांना दमदाटी केली. वास्तविक स्पीकर दहानंतर वाजवू नये नियमामुळे राज्यभर ७-९ या वेळेत कीर्तने होत आहे. या ठिकाणी दहा वाजून पाचच मिनीटे झाली होती. पोलीस अधिकाऱ्याने सामोपचाराने आयोजकांना समज दिली असती किंवा गुन्हा दाखल करायला मोकळे असते. परंतू, तसे न करता थेट बुटासह नारदाच्या गादीवर जावून अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणे निंदनीय आहे. समस्त वारकरी संप्रदायाचा घोर अपमान आहे. यामुळेच भाविकांत संतापाची तिव्र भावना आहे. तेव्हा अशा पोलीस व वारकरी यांच्यामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोलीस निरक्षक के.के.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी केली होती. दरम्यान ही मागणी मान्य न झाल्याने सोमवारी ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन व किर्तन करून आंदोलन करण्यात आले.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/735848801191185

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/377928080940835

Protected Content