Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटीलचे आव्हान कायम

WhatsApp Image 2019 10 11 at 2.40.29 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुंबई येथे होत असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत १४ मुलींच्या वयोगटात गो. से. हायस्कूल ,पाचोरा व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची दत्तक खेळाडू भाग्यश्री पाटील ९ फेरीअखेर ५ विजय २ बरोबरी व २ पराभूत असे ६ गुण मिळवले आहेत.  शेवटच्या दोन फेरीत दोन विजय मिळवण्यास पहिल्या तीन क्रमांकात यायचे आव्हान कायम ठेवले आहेत.

भाग्यश्री पाटील ही ९ फेरीअखेर १२व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आघाडीवर नेदरलँडची रॉबर्स एलिन साडेसात गुण व दुसऱ्या क्रमांकावर मंगोलियाची मुंगूझुल बॅट-एरंडीन, अझरबैजानची अलाहयेरडियेवा अयान ७ गुण, तिसऱ्या क्रमांकावर भारताची दिव्या देशमुख व रक्षिता रवी, रशियाची नसिरोवा एकातरीना, कझाकिस्तानची कमालीदिनोवा मीरत व पोलंडची विकार मार्टीना ६.५ गुण. चौथ्या क्रमांकावर ६ गुणांवर भाग्यश्री पाटील व चार मुली आहेत. भारताची दिव्या देशमुख व रक्षिता रवी जागतिक वयोगटात जागतिक विजेते ठरलेले आहेत. तर भाग्यश्री पाटील जागतिक ८ वयोगटात तिसरा क्रमांक मिळवला आहे तरी ह्या तिघी मुलींकडून भारतातील बुद्धिबळ प्रेमींची अपेक्षा आहे. जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत दरवर्षी भारताला जास्त मेडल मिळत असल्यामुळे मेडलच्या गुणक्रमांक आधारे पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा भारताला मिळत आहे. भाग्यश्रीच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्य्क्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अतुल जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव एन. जे. गादिया, परिवर्तनचे शंभू पाटील यांनी शुभेच्छा पाठविल्या आहेत.

Exit mobile version