Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भागवत सप्ताह

चोपडा प्रतिनिधी । श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज संस्थेतर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव श्रीराम नगर येथे तेली समाज मंगल कार्यालय संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे भागवत सप्ताह व कीर्तन सप्ताह या माध्यमातून साजरा होत आहे.

यानिमित्ताने महिलांसाठी 7 जानेवारी रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत लहान मुलींसोबत वरिष्ठ महिलांनी सहभाग नोंदविला. विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. यावेळी विशेष रांगोळीचा सन्मान जयश्री चौधरी, कोमल पाटील, गौरी पाटील, प्रिया चौधरी, गलिमा चौधरी, उन्नती पाटील, पूजा चौधरी, धनेश्वरी चौधरी, पूर्णिमा चौधरी यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला. योगिता चौधरी, सीमा चौधरी, वैशाली चौधरी यांनी परीक्षण केले. 

जिजाबाई चौधरी, नम्रता चौधरी, रंजना चौधरी, शशिकांत चौधरी, श्रावण सूर्यकांत, के चौधरी, गोपीचंद चौधरी आदींनी व्यवस्था पाहून स्पर्धेचे नियोजन पूर्ण केले. यावेळी बैलांनी रांगोळीच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव दिला याचे ह भ प अशोक दास जी महाराज महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष के डी चौधरी, प्रशांत चौधरी,  यांनी महिलांना प्रोत्साहित केले देवकांत के चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Exit mobile version