Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात भगवान झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील ओत्तर गल्लीतील बाबा ज्युडियाराम साहेब मंदिरात सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आला याप्रसंगी सकाळी जय झुलेलाल नवयुवक मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यानंतर भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पंचामृत अभिषेक करण्यात आला तद्पश्यात जय झुलेलाल नवयुवक मंडळाच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली याप्रसंगी आयोलाल झुलेलाल चा जयघोष करीत मोटारसायकल रॅलीने मार्गक्रमण करीत मंदिर परिसरातुन बाजारपेठ मार्गे मोठा महादेव चौंकातुन परत मंदिर परिसरात विसर्जित करण्यात आले त्यानंतर भजन कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी समाज बांधवां साठी आम भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी समाजातील विवाह योग्य असलेल्या मेट्रोमोनी ज्यात जवळपास ७० शहरातील युवक युवतींचे बायोडाटा असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले हे पुस्तक जळगाव येथील बाबा हरदासराम मैट्रीमोनी यांच्या सहकार्याने उपलब्ध झाले
सांयकाळी ओत्तर गल्लीतुन बॅन्ड बाज्याच्या गजरात भव्य अश्या मिरवणूकीला सुरुवात झाली मिरवणुकीत सिंधी गीताच्या तालावर सिंधी नृत्य सादर करण्यात आले मिरवणूक मंदिरापासून गावहोळीचौक, न पा चौक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर जय झुलेलाल सिंधी पंचायतीच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर महस्वे येथील तलाव पवित्र ज्योत हि पाण्यात प्रवाण करण्यात आली याप्रसंगी संपूर्ण विश्वात सुख समृद्धी व आरोग्य नांदो म्हणून भगवान झुलेलाल यांना साकडे घालण्यात आले.संपूर्ण दिवसभर समाजातील प्रतिष्ठान (दुकानें) बंद ठेवण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारोळा सिंधी समाजाचे सुरेश हिंदूजा, बालचंद नंदवानी, शंकर, हिंदुजा राजकुमार नागदेव, खेमचंद हिंदुजा, चंद्रलाल नंदवानी, मनोहर हिंदुजा, अशोककुमार लालवाणी, धर्मेंद्र हिंदुजा कैलास वालेचा, महेश हिंदुजा, मनोज लुल्ला, तसेच नवयुवक मंडळाचे सदस्य प्रशांत नागदेव, योगी हिंदुजा, कमल लालवाणी,किशोर नंदवानी, बन्सीलाल हिंदुजा, प्रसिद्धी प्रमुख विक्रमकुमार लालवाणी, दिपक हिंदुजा, मुकेश नंदवानी, जितेंद्र हिंदुजा, विजय रहेजा, हिरानंद हिंदुजा, हरेश हिंदुजा अजय लालवाणी, भारत हिंदुजा, पंकज हिंदुजा, सन्नी नागदेव, जितेंद्र नंदवानी, मयंक हिंदुजा, विष्णू वालेचा, राम हिंदुजा, यांच्या सह शहरातील समाजातील सर्व लहान मोठे अबालवृद्ध महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version