Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे शिवप्रेमींनी केला भगवान गोयलचा निषेध

WhatsApp Image 2020 01 13 at 6.04.36 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे शिवप्रेमींनी भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती तयार करून या पुस्तकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महाराजांचे नाव वगळून तयार केलेल्या पुस्तकाच्या प्रती ज्यावर फक्त नरेंद्र मोदी एवढे नाव आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो असे प्रकाशन करत असतानांचा भगवान यांचा फोटो यांचे दहन केले.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून देशभर आंदोलने सुरू आहेत. चाळीसगाव येथे या प्रतिकात्मक पुस्तकाची होळी करतांना शिवप्रेमींनी घोषणाबाजी देखील केली. यावेळी बोलतांना म्हणाले की, कुणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होऊ शकत नाही आणि म्हणून भगवान गोयल याच्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. ज्या भाजपा कार्यालयात त्याचे प्रकाशन झाले त्या कार्यालयाच्या प्रमुखांवर आणि प्रकाशनावेळी उपस्थित असलेल्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिवप्रेमी उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यापुढे अशा पद्धतीने जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्यास त्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे देखील यावेळी सांगितले गेले.

Exit mobile version