Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा स्वबळाचा नारा

भडगाव प्रतिनिधी | नगरपालिकेसह तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांबाबत भूमिका जाहीर करण्यात आली. या बैठकीत प्रारंभी पक्षाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी गोंडगाव येथील राहुल पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या प्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष शामकांत भोसले, नूतन जिल्हा महिला उपाध्यक्ष योजना पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील, युवक उपाध्यक्ष कुणाल पाटील, तालुका कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, कार्यालयीन प्रमुख शरद पाटील, भरत चव्हाण, मिलिंद अहिरे, रोहन परदेशी व पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील व शामकांत भोसले म्हणाले की, सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहेत. यासाठी लवकरच प्रभागनिहाय काम, शाखा नव्याने उभारू, जि.प., पं.स. व गटप्रमुख आदी सर्व समित्या नव्याने जाहीर करू. नेत्यांनी निर्णय घेतल्यास महा विकास आघाडी होईल. मात्र आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असे असे हर्षल पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version