Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव नगरपालिकेतर्फे अमृत वाटिका तयार करण्याचा शुभारंभ

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भडगाव नगर परिषदेने माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत अमृत वाटिका तयार करण्याचे आयोजन करण्यात आले.

भडगाव नगर परिषदेच्या निसर्गरम्य ठिकाणी ऑक्सिजन पार्क येथे अमृतवाटिकेचा शुभारंभ करण्यात आला.  भारतीय प्रजातीच्या वृक्षांची प्रामुख्याने लागवड या वाटीकेत केली गेली. भडगाव नगरपरिषदेच्या ऑक्सिजन पार्कचे एक वैशिष्ट्य म्हणजे परिषदेने मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचे विविध टप्पे हाती घेतले आहे. पहिला टप्पा पूर्ण होऊन एक घनदाट अरण्यात त्याचे रूपांतर होण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गिक  पद्धतीने प्राण्यांचा, पक्षांचा, वृक्षांचा अधिवास टिकवण्याचा भडगाव नगर परिषदेचा मानस यातून स्पष्ट होतो.

 

भडगाव नगर परिषदेने या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव येथील माजी सैनिकांना आमंत्रण दिले, यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. तसेच सौ.रजनीताई देशमुख कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी, आदर्श कन्या विद्यालयातील मुलींचा स्काऊट गाईड पथक कार्यक्रमाला उपस्थित होता.

 

भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले ऑक्सिजन पार्कच्या भविष्यातील प्रोजेक्ट बाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर माजी सैनिक प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, भीमराव माळी, दिलीप वाघ, डी. एस. मराठे , प्राचार्य एन. एन. गायकवाड प्रा. दिनेश तांदळे, प्रा. रोकडे, रविंद्र महाजन, सोमनाथ पाटील, भडगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच भडगाव नगरपरिषदेच्या  अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version