Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एटीएमचा पीन क्रमांक विचारून सात लाखांचा गंडा

FIR

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलेस तिच्या एटीएमचा पीन क्रमांक विचारून बँक खात्यातून ७ लाख १९ हजार रूपये काढून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव पोलीस स्थानकात नयन आननसिंग गढरी (वय १९ रा. पिंपरखेड ता. भडगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ ते ३१ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची आई कविता गढरी यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. गढरी यांचे पिंपरखेड येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते आहे.

काही दिवसांपूर्वी नयन गढरी (वय १९) हा आईसोबत पिंपरखेडहून भडगाव येत होता. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरली होती. अपघातात कविता गढरी यांना किरकोळ मार लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

यावेळी नयनने आईच्या एटीएमद्वारे बसस्थानकासमोरील ऍक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यावेळी पैसे निघत नसल्याने त्याला अनोळखी व्यक्तीने मदत केली होती. यासाठी त्या व्यक्तीने एटीएमचा पीन क्रमांक विचारला होता. यानंतर गढरी हे पिंपरखेड येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख १९ हजार रूपये काढून घेतले असून खात्यात एकही पैसा शिल्लक नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्तीने हा प्रकार केला असल्याचा संशय नयन गढरी यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा भडगाव पोलीस तपास करत आहेत.

Exit mobile version