Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तालुक्यातील ‘एकल’ महिलांना विविध योजनांचा लाभ

पाचोरा प्रतिनिधी । येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात महाराजस्व योजने अंतर्गत “वात्सल्य” योजनेतून कोविड – १९ या महामारीत ‘एकल’ झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, शिधा पत्रिकाचे वाटप व प्राधान्य योजनेचा लाभ व बालविकास योजनेतून ११ बालकांना सज्ञान होईपर्यंत लाभ अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

यावेळी तहसिलदार कैलास चावडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार भागवत पाटील, पुराठा विभागाच्या नायब तहसिलदार पुनम थोरात, महिला व बाल प्रकल्प अधिकारी पदम परदेशी, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अजयसिंग पवार, नगरपरीषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले (आप्पा), संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून सुरेश पाटील, भाऊसाहेब नेटके, सिमा पाटील, विस्तार अधिकारी सुनिल पाटील, उमेश शिर्के, कृषी विभागाचे सचिन भैरव, हेमंत जडे सह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

पाचोरा येथील तहसिलदार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना अंतर्गत कोरोना व्हायरस काळात पती दगावलेल्या रत्ना ज्ञानेश्वर बडगुजर (लोहारी), नलिनी प्रभाकर देव (पाचोरा),  ज्योती सुभाष काळे (बांबरुड राणीचे), सलमाबी रमजान मन्यार (शिंदाड), वैशाली मार्तंडराव देशमुख (पाचोरा), अश्विनी संदिप शिंदे (चिंचपूरे), उज्वला योगेश सोमवंशी (बाळद), संगिता गौतम बाविस्कर (खेडेगाव), कांचन नारायण अहिरराव (खेडगाव नंदिचे), पंचशिला नरेंद्र अहिरे (सारोळा), मनिषा सुरेश परदेशी (दिघी) या महिलांना मिळाला प्राधान्य योजनेचा लाभ पाचोरा तालुक्यातील निलीमा वाल्मिक साळुंखे (शिंदाड), शारदा निळकंठ पाटील (परधाडे), संगिता सपकाळे (शिंदाड), सरला संभाजी बोरसे (बांबरुड), उषा विकास पटाईत (पाचोरा), महिला व बालकल्याण विभागामार्फत बालसंगोपन योजनेचा लाभ प्रत्येकी १ हजार १०० रुपये प्रमाणे उषा प्रणयकुमार पुजारी, वर्षा शिंपी, पंचशिला अहिरे, सुनिता प्रशांत निकम सह ५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

 

Exit mobile version