Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुन्हा वाजली घंटा : राज्यातील शाळा सुरू !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.

कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळांचे नियोजन बिघडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोविडचा प्रकोप आटोक्यात आल्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या तरी यंदा परिक्षा विलंबाने घेण्यात आल्या होत्या. यामुळे उन्हाळी सुट्यांनंतर शाळा नेमक्या कधी सुरू होणार याबाबत औत्सुक्य होते. या संदर्भात शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच सोमवार दि. १३ जून पासून शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.

या अनुषंगाने आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व ती खबरदारी घेऊन आज राज्यातील शाळांमधील घंटा वाजल्याचे दिसून आले आहे.

 

Exit mobile version