Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जन्मदात्या आई-वडिलांनी पाचवी मुलगी झाल्याने केली हत्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबई शहरातील मुंब्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने १८ महिन्याच्या मुलीची हत्या करून आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आई नुरानी जाहीद शेख, वडील जाहीद सलामत शेख याना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ताब्यात घेतलं आहे. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि ती आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुतळ्याची कबुली दिली आहे.

दीडवर्षाच्या चिमुरडीची हत्या करून हत्येनंतर दाम्पत्यांनी १९ मार्च रोजी रात्री २-३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह पुरला. मात्र ४ एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. अटक दाम्पत्याला न्यायालयात नेले असता १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.  याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास करत संशयावरून आई नूरानी आणि वडील जाहिद यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुंब्रा पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. शेवटच्या झालेल्या दोन मुली हबीब आणि लबीबा दाम्पत्याला नको होत्या. यापूर्वी हबीबा हिची जीभ कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version