Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष ‘राष्ट्रीय’ होत नाही ! : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष ‘राष्ट्रीय’ होत नसल्याचे नमूद करत शरद पवार यांची खिल्ली उडविली आहे.

गोव्यात शरद पवार हे टीएमसी, कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या वरून भाजपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शरद पवारांवर निशाणा साधला आहे. नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! असे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीस पुढे म्हणाले की, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल.

Exit mobile version