Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मासे विक्री करण्याच्या कारणावरून मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मासे विक्री करण्याच्या कारणावरून महिलेसह इतर चार ते पाच जणांना शिवीगाळ करून मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण येथील पाण्याचा हौदाजवळ काही मासे विक्रेते मासे विक्री करण्यासाठी दुकान लावले आहे. दरम्यान येथील रहिवासी नैना सतीश चौधरी आणि काही नागरीकांनी मासे विक्रेत्यांना सांगितले की, ‘तुम्ही येथे मासे विक्री करू नका, परिसरात सर्वत्र दुर्गंधी निर्माण होते’ असे सांगितले. याचा राग मासे विक्रेत्यांना आल्याने अंकुश भिल आणि विनोद गेंग्या (पुर्ण नाव माहित नाही) रा. भिलाटी, मेहरूण, जळगाव यांनी विवाहितेसह व इतर चार ते पाच जणांना काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले.  जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही घटना ७ मे रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश भिल आणि विनोद गेंग्या (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

 

Exit mobile version