जुन्या वादातून भाजीपाला विक्रेत्याला मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगर भागात मागील भांडणाच्या कारणावरून एका भाजीपाला विक्रेत्याला फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय मधुकर बोरसे (वय-४१) रा. बजरंग मंदिराजवळ, समता नगर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात.  गुरूवार २८ एप्रिल रोजी  रात्री ११ वाजता वाजेच्या सुमारास ते घरी असतांना  मागील भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारे किरण अडकमोल, सनी अडकमोल, गायकवाडचा मोठा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि भावड्या दुगला करोसिया सर्व रा. समता नगर यांनी संजय बोरसे यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यातील किरण अडकमोल याने संजय बोरसे यांच्या तोंडावर फायटरने मारून गंभीर दुखापत केली जखमी. झालेल्या संजय बोरसे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुरूवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७वाजता संशयित आरोपी अडकमोल, सनी अडकमोल, गायकवाडचा मोठा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि भावड्या दुगला करोसिया सर्व रा. समता नगर यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.

 

Protected Content