Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून विवाहितेसह तिच्या आई व मेव्हण्यांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मला न विचारता दवाखान्यात का गेली म्हणत विवाहितेला तिच्या पतीसह जेठ व पुतण्याने बेदम मारहाण केली. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विवाहितेच्या आईसह मेव्हण्यांच्या डोक्यात विट टाकून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केटसमोर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात रुपाली विकास चव्हाण या विवाहिता वास्तव्यास असून त्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. मंगळवार 26 मार्च रोजी दुपारी त्यांची तब्येत बरी नसल्याने विवाहिता त्यांच्या बहीणीसोबत दवाखान्यात गेल्या होत्या. दुपारी ४ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून घरी आल्यानंतर विवाहितेचा पतीने विवाहितेला तु मला न विचारता दवाखान्यात का गेली असे म्हणत विवाहितेला मारहाण केली. त्यामुळे विवाहिता रागाच्या भरात त्याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे निघून गेल्या. सायंकाळच्या सुमारास विवाहितेचा पती विकास चव्हाण, जेठ बबन चव्हाण व पुतण्या विनोद चव्हाण त्याठिकाणी आले. त्यांनी विवाहितेला शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विवाहितेचे मेव्हणे योगेश राठोड व त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केली. विवाहितेची आई व मेव्हणे मध्यस्ती करीत असतांना त्यांच्या डोक्यात वीट टाकून त्यांना गंभीर जखमी केले. जखमींनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विकास चव्हाण, बबन चव्हाण व विनोद चव्हाण यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version