Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीची छेडखानी प्रकरणात जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही एसटी बसने शाळेत जात असतांना बसमध्ये तरुणांनी गर्दीचा फायदा घेत मुलीची छेडखानी करीत विनयभंग करून त्या मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी ही नियमीतपणे आपल्या गावाहुन शिरागड ते यावल एसटी बसने ८ जुलै ते १३ जुलै रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास पथराळे ते साकळी गावाच्या दरम्यान प्रवास करते. शिरगड ता.यावल येथील राहणारे आदीत्य ज्ञानेश्र्वर सोळंके , तुषार सुर्यभान सोळंके , प्रशांत कैलास सोळंके , सुर्यभान आधार सोळंके या सर्व संशयीत आरोपींनी एसटी बस मध्ये गर्दीचा फायदा घेत  शाळकरी अल्पवयीन मुलीच्या शरीराला स्पर्स करून मनास लज्जा उत्पन्न होईल करून त्या अल्पयीन मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

यावेळी जाब विचारण्यास गेलेले शुभम राजाराम  धिवर, गोपाळ शांताराम धिवर, हुताशिणी गोपाळ धिवर सर्व राहणार पथराळे यांना चापटा बुक्यांनी व काठीने मारहाण केली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यावलगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.

Exit mobile version