Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसताना एकाला शिवीगाळसह मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा कॉलनीतील ५० वर्षीय एकाला त्याचा मुलासह काहीही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार ३० जून रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर पंढरीनाथ पाटील (वय-५०) रा. कोठारी नगर, हरीविठ्ठल नगर जळगाव हा तरुण खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार ३० जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील आशा बाबा नगर येथे रेल्वे पुलाचा जवळून मुलगा कैलास याच्या सोबत जात असताना अज्ञात 3 जणांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली. तर सोबत असलेले त्यांचा मुलगा कैलास पाटील याला देखील काचेने पोटावर वार करूनच काम केले. या घटनेनंतर मधुकर पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम पाटील करीत आहे.

Exit mobile version