Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भेटण्यासाठी आलेल्या विवाहितेच्या नातेवाईकांना मारहाण; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मदारी नगरात राहणाऱ्या एका विवाहितेला तिचे आई-वडील बहीण भेटण्यासाठी आल्याच्या रागातून तिच्या पतीने विवाहितेच्या नातेवाईकांना लोखंडे पाईप, फायटरने मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नसरीन शकील खाटीक वय-३२ या महिला आपल्या परिवारासह चाळीसगाव शहरातील मदानी नगरात वास्तव्याला आहे. दरम्यान रविवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता विवाहितेला तिचे आई-वडील बहीण असे भेटायला आले होते. या कारणावरून नसरीन शकील खाटीक यांचे पती शकील बशीर खाटीक यांनी विवाहितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून चापट्याबुक्क्यांनी तसेच फायटर आणि लोखंडी पाईपाने मारहाण करून दुखापत केली. दरम्यान या प्रकरणी विवाहितेने सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शकील बशीर खाटीक, फारुख शरीफ शाह, रिजवान शरीफ शाह, चिंता शरीफ शाह रा. नागद रोड चाळीसगाव या चौघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पुढील पोहेकॉ प्रवीण जाधव हे करीत आहे.

Exit mobile version