यावल येथे किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; पोलीसात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । फैजपुर ते यावल रोडवरील भाग्यश्री हॉटेल जवळ दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून हॉटेलमधील खुर्ची मारून एकाला जखमी केल्याची घटना मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी रात्री १० वाजता एकावर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीरा रामा जावरे (वय-५५) रा. मेन रोड यावल जि. जळगाव हे मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फैजपूर ते यावलरोड वरील भाग्यश्री हॉटेलजवळून जात असताना संशयित आरोपी समाधान प्रभाकर कुंभार रा. यावल हा दारूच्या नशेत फकीरा जावरे यांना फकीऱ्या या नावाने चिडवत होता. याचा जाब विचारला असता समाधान कुंभार याने हॉटेल मधील खुर्ची उचलून फकीरा जावरे यांच्या डोक्यात टाकली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्री १० वाजता फकीरा जावरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात समाधान कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

Protected Content