Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरदेवळा येथील चहाविक्रेत्याला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा नदीपात्रात भरत असलेल्या आठवडे बाजारात दुकान लावण्याच्या कारणावरून चहा विक्रेत्याला दोन जणांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नगरदेवळा गावातील अग्नावती नदीच्या पात्रात दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. या ठिकाणी अन्सार शेख इब्राहिम बॅक (वय-४०) रा. नगदेवळा हे चहाचा व्यवसाय करतात. त्यांच्या बाजूला संजय धुडकू भोई व  ज्ञानेश्वर संजय भोई दोन्ही रा. नगर देवळा ता.पाचोरा जि. जळगाव हे देखील दुकान लावतात. त्याचवेळी अन्सान यांनी दुकान रस्त्यावर लावण्याच्या कारणावरून अन्सार बेग याला शिवीगाळ मारहाण करून जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात अन्सार बॅग यांच्या फिर्यादीवरून दोन जणांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे करीत आहे.

 

Exit mobile version