Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीविठ्ठल नगरात प्रौढाला मारहाण; रामानंदनगर पोलीसात एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून ४४ वर्षीय प्रौढ व्यक्तीला एकाने शिवीगाळ करून विट मारून जखमी केल्याची घटना हरीविठ्ठल नगरात घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शंकर नारायण कोकाटे (वय-४४) रा. हरीविठ्ठल नगर हे प्लंबरचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गल्लीत राहणारा संशयित आरोपी राजेश जगन सोनवणे हा तरूण घराकडे येवून शंकर कोकाटे पाहतो व निघून जातो. पुन्हा आल्यानंतर शंकर कोकोट यांनी घराकडे का येतो अशी विचारणा केली असता संशयित आरोपी राजेश सोनवणे याने शिवीगाळ केली व बाजूला पडलेली विटाने बेदम मारहाण केली. यात कोकाटे जखमी झाले. शंकर कोकाटे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेश सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे. 

 

Exit mobile version